भजी भजी म्हणजे अगदी सर्वांचा आवडता पदार्थ...!. भजी आवडत नसलेला कोणी जगात असेल असे मला नाही वाटत !!एकवेळ आंबा न आवडणारा भेटेल पण भज्याला नाही म्हणणारा कोणीच नसणार ..पावसाळी हवामानात भजी खाणे म्हणजे भन्नाट अनुभव!!!!जो प्रत्येक जण घरी किंवा बाहेर घेतोच नाव वेगळे असेल पण भारतभर मिळणारा प्रकार आहे हा. !!!साउथला बोंडा म्हणतील, नॉर्थला पकोडे म्हणतील पण भजी असतीलच. भज्याचे पीठ म्हणजे भज्याची जान जान सलामत तर भजी पचास.. असे म्हणायला हरकत नाहीं कधी पातळसर कालवलेले पीठ,तर कधी घट्ट ,तर कधी मध्यम .. कधी बेसन तर कधी भाजणी.कधी मिक्स... असंख्य चवीचे असते हे भज्यांचे पीठ ...कधी कोणी या पीठात ओवा घालतील तर कधी कोणी झणझणीत लाल