नियती - भाग 42

  • 1.7k
  • 968

भाग 42आता टॅक्सी थांबवली एका जुनाट वाटणाऱ्या इमारती समोर ..तेथे जॅक उतरला पूर्वी..... जूलीच्या पाठोपाठ मायरा उतरली... एका जुन्या चाळवजा इमारती समोर ते उभे होते..त्या इमारतीत प्रत्येक दारात आणि खिडकीत बायका उभ्या होत्या..... का उभ्या असाव्या...??? प्रश्न पडला.... असता जर मायरा शुद्धीत असती तर....मायरा तरीही डोळे तटतटंत पहात होती.... डोक्यावर ताण देण्याचा प्रयत्न करत होती.... भ्रमात होती तरीही... ती जुलीला अडखडत म्हणाली...."या सर्व खिडकीत का उभे आहेत...??? ही उभी राहण्याची काय पद्धत आहे....?? काही लाज लज्जा...???"मायरा वळून वळून त्या बायकांकडे पाहत होती... आश्चर्याने.... रागाने... पण मनात तिच्या आता भीती निर्माण झाली होती..जुलीच्या शब्दाने ती तिच्याकडे पाहू लागली...."चल गं... उभी का आहेस....??"असे