एक पत्र वडिलांना ती कै काकाना सा नमस्कार आता पर्यंत वेगवेगळ्या वेळी आपण अनेक पत्रे एकमेकांना लिहिली पण हे पहिलेच पत्र मी लिहिते आहे जे तुम्हाला पाठवू शकत नाहीआणि तुमच्या मृत्युनंतर मी तुम्हाला लिहित आहे .तुमची लाडाची पहिली आणि एकुलती एक लेक होते मी !!!तुम्ही वडील असला तरी मी काकाच म्हणायची तुम्हाला अगदी खुशीने माझी पहिली बेटी धनाची पेटी आहे असे तुम्ही म्हणायचा . माझ्या आगमना मुळे तुमचे आयुष्य भरभराटीला आले असे वाटायचे तुम्हाला त्यामुळे खूप खूप कौतुक आणि लाड करीत होता तुम्ही माझे ...तुमच्या तुटपुंज्या कमाईत नेहेमी आधी माझेच हट्ट पुरवले जायचे आई तर लटक्या रागाने नेहेमी म्हणत असे ..तुमच्या लाडाने वेडी होईल हं ती....मी लाडकी