पुण्यस्मरण वडिलांचे आजच्या तिथीला वडिलांचे निधन झाले .आम्ही त्यांना काका म्हणायचो ...वडील निस्सीम गणपती भक्त होते .या तिथीलाच त्यांचा मृत्यू होणे हा एक योगायोगच ..त्यांचे नाव लक्ष्मीकांत विश्वनाथ देव .आम्ही माहेरकडून चिंचवडच्या मोरया गोसावीचे वंशज त्यामुळे आम्हीच देव आहोत असे समजले जाते कारण मोरया गोसावीची गणपतीवर इतकी भक्ती होती व त्याच्या तपश्चर्येत ते इतके मग्न असत की प्रत्यक्ष गणपती सुद्धा देऊळ सोडुन त्याला भेटायला बाहेर येत असे अशी आख्यायिका आहे .आमच्या घरात बाहेरून गणपतीची मुर्ती आणली जात नसे .त्यामुळे विसर्जना चा प्रश्नच नसे .गणेशचतुर्थी पासुन अनंता पर्यंत सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती मात्र केली जात असे .त्या काळात वडील रोज सोवळ्याने अथर्वशीर्ष एकवीस वेळा म्हणत