भाग. ४ " ठक...ठक..!" दार ठोठावण्याचा आवाज येताच माधुरी बाईंनी खाडकन डोळे उघड़ले , अंथरुणातच उठुन बसल्या.. " ईतक्या रात्री कोण असेल?" माधुरीबाई स्वत:शीच म्हंटल्या. " ठक..ठक...!" पुन्हा दारावर ठोठावल गेल. माधुरीबाई हळूच जागेवरुन उठल्या , दरवाज्यापाशी पोहचल्या आणि दरवाजा उघड़ण्यासाठी त्यांनी कडीवर हात ठेवला.. पन माधुरीबाईंनी कडी उघड़ली नाही, कारण त्यांना वेळीच आपल्या आईची एक गोष्ट लक्षात आली होती.. की भुतखेत , दोनदाच दरवाजा ठोठावतात ..तिस-यांदा ठोठवत नाही, ह्या सृष्टीच्या रचेत्याचे -निर्मात्याचे काही नियम आहेत , ज्या नियमांना बाळगूणच त्या आनिष्ठ शक्तिंना ईथे आसरा मिळाला आहे..