भाग ३ आंतिम हळू हळू रात्रीचा प्रहार वर चढत होता , चंद्र आपली जागा बदलत होता , काळे ढ्ग चंद्राजवळून वाहत पुढे निघुन जात होती . अस म्हंणतात थंड हवेचे झोत दुर दुरचे आवाज आपल्या सहित वाहून नेहतात.. कारण जंगलातच कोठेतरी , गुढ गर्भात एका हिंस्त्र श्वापद लांडग्याची विव्हळ फुटली... " व्हू..व्हू..व्हू...हुहुह्हू..!" तो आवाज कचरुबांच्या झोपेला चालवून गेला, आपसूकच त्यांचे दोन डोळे उघड़ले गेले.. कचरुबांच्या डाव्या हातात एक घड्याळ होत , त्यात मध्यरात्री अडीज वाजले होते..! पुन्हा एक फेरी मारुन याव अस ठरवून कचरुबा खाटेवरुन उठले