भाग 16 भुल्या 2 ! भुल्या पायाखालचा रस्ता लाल मातीचा होता , दोन्ही तर्फ उन्हाच्या झळ्यांनी सुकलेल हिरव गवत , जामिनदोस्त झालेल दिसत होत. रातकीड्यांची किरकिर कानांत ऐकू येत होती- हळकीशी थंडी अंगाला झोंबत होती, आजूबाजुला जरास माळरानच होत.. वा-याचा व्हू व्हू घोंघावण्याचा आवाज कानी पडत होता. हातातळ्या टॉर्चच्या पिवळसर उजेडात कचरुबा आपला मार्ग हेरत चालत निघाले होते.. टॉर्चच्या पिवळसर उजेडात खालची लाल माती , दिसत होती. आजूबाजुला निर्मनुष्य भाग असल्याने , जमिनीवर रेंगाळणा-या किड़यांना फिरायला कसलेच बंधन उरले नव्हते - पिवळ्या रंगाच्या