मृत्यु हा टाळता येणे अशक्य?

  • 1.1k
  • 366

मृत्यू हा टाळता येणं अशक्य?           सकाळी उत्साह होता. आपण सहलीला जाणार. मजा करणार. नवंनवं पाहायला मिळणार. आपल्या सवंगड्यासोबत गप्पा मारायला मिळणार. शिक्षकांसोबत नृत्य करायला मिळणार, भेंड्या खेळायला मिळणार, गाणी म्हणायला मिळणार. तीच ती शाळा असणार नाही. तोच तो कंटाळवाणा अभ्यास असणार नाही. निसर्ग रम्य वातावरण असेल आणि त्यात सर्वांना रमता येईल.          निर्वाणीलाही तेच वाटत होतं. तसाच विचार करुन तिही शाळेची सहल जाते म्हणून आईवडीलांच्या मागे लागून सहलीचं शुल्क भरलं. तिला काय माहीत होतं की आपण सहलीला जाणार व आपल्याला मृत्यू कवटाळेल. परंतु घात झाला.          निर्वाणी सरस्वती विद्यालयात शिकणारी दहावीची विद्यार्थीनी.