अनुबंध बंधनाचे. - भाग 22

  • 1.7k
  • 1.1k

अनुबंध बंधनाचे.....( भाग २२ )प्रेम बाहेर टीव्ही बघत बसलेला असतो. मस्त फिल्म लागलेली असते,' दिल तो पागल है... समोर टिव्हीवर माधुरी आणि शाहरुख खान चा एक रोमँटिक सीन चालु असतो.....त्याच वेळी अंजली अंघोळ करून टॉवेल ने तिचे ओले केस पुसत तिथे येते. प्रेमचे लक्ष टीव्ही कडे असते. अंजली पाठीमागून त्याच्या जवळ येते. टॉवेल तिथेच बाजुला ठेऊन देते, आई तिथे नाही याची खात्री करून ती तिचे दोन्ही हात मानेवरून त्याच्या हनुवटी जवळ घेत, हळुवार त्याचे डोके कोच वर टेकवते. तिच्या ओल्या केसांनमधुन टपकणारे पाण्याचे थेंब त्याच्या चेहऱ्यावर पडत होते. दोघांची नजरानजर होताच अलगद ती त्याच्या कपाळावर किस करते. आणि पटकन तिथून बाजुला होते.