भज्यांची आमटी

  • 3.2k
  • 1k

भज्याची आमटीहा एक अत्यंत चविष्ट आणि खमंग प्रकार जो भात भाकरी किंवा पोळी कशा सोबतही चांगला लागतो भज्याची आमटी म्हंटले की कॉलेज चे दिवस आठवतातया आमटीची ही चवीष्ट आठवण सांगितल्या खेरीज ही कृती पुरी होत नाहीं माझ्या मैत्रिणीची आई ही आमटी अतिशय चवदार करीत असेज्या दिवशी मैत्रीणीकडे या आमटीचा बेत असेत्या दिवशी सकाळी ती आमच्या खास ग्रूप मधील आम्हा दोघी  मैत्रीणीना सांगत असे ..आज दुपारी आपण तिघी एकत्र माझ्याकडे जेवायचे आहे बर का..आज आई भज्याची आमटी करणार आहेसाधारण महिन्यातून दोन वेळ तरी तिच्याकडे हा बेत असेच..कारण तिच्या घरच्या सर्वानाच ही आमटी अवडत असे..मैत्रिणीने असे सांगितल्या क्षणा पासून कॉलेजमधले आमच चित्त उडून जात