नियती - भाग 36

भाग 36सुंदर च्या हालचालींचे निरीक्षण करत...फौजदार म्हणाले..."नानाजी.. आम्ही सगळे पाहुणचार तर तुमच्याकडेच घेणार आहोत पण त्यापूर्वी आम्ही सर्व बाबाराव यांच्या घरी चहा पाणी घेणार आहोत. हे मात्र आमचं पूर्वीच ठरलेलं होतं तेव्हा आम्ही ते बदलू शकत नाही... "हे ऐकून सुंदर च्या माथ्यावरील शीर पुन्हा तट्ट झाली... पण तो काही बोलण्याच्या अगोदरच......फौजदार पुन्हा म्हणाले....."नानाजी... आम्ही इथे दोन दिवस आहोतच.... आता मुक्काम आहे तोही... कुठे करायचा आहे सुद्धा ठरलं... पण आता आम्हाला बाबाराव यांच्याकडे महत्त्वाचे काम आहे तर चहा पाण्यासाठी आम्ही निघतो म्हणत आहोत...??"असे म्हणून त्यांनी सर्वांना हात जोडून नमस्कार केला.त्यांनी असे म्हटल्यानंतर नानाजी आणि सुंदर या दोघांचाही नाईलाज झाला.आता एका दिशेने