आर्या... ( भाग ४ )

  • 1.9k
  • 1.1k

  आर्या च्या नवीन जीवन प्रवासाला सुरुवात झाली होती . अनुराग आणि श्वेता तिच्या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवत असे . कधी कधी आनंदाने पण कधी कधी काळजीने आणि चिंतेने ! आर्याच्या जन्माच्या आधी डॉक्टरांनी जे सांगितलं होत ते अजून ही सगळ्यांच्या मनात घर करून होतच! म्हणून तिच्या प्रत्येक हालचालींवर घरातील प्रत्येक जण नकळत का होईना पण लक्ष ठेवत असे !    श्वेता आर्या सोबत खूप खुश होती .तिला तिचा पूर्ण दिवस कसा जात असे कळत ही नसे ! बऱ्याचदा आर्या रात्री जागवत असे . श्वेता ला थकल्यासारख होत असे पण आर्या पूर्ण डोळे उघडुन टकमक बघत असायची आणि तिच्या त्या