अनुबंध बंधनाचे.....( भाग २० )प्रेम खिडकिमधून बाहेर पहात असतो. एवढ्या वर्षात तो खुप मुंबई फिरून झालेला असतो. पण त्याच मुंबईचे असे आकाशातुन दिसणारे दृश्य हे खरोखर विलोभनीय होते. मोठमोठ्या इमारती, अथांग पसरलेल्या समुद्राकडे तो टक लावुन पहात होता. काही क्षण तो हेही विसरतो की अंजली त्याच्या बाजुला बसली आहे, आणि तिचा हात त्याने अजुनही तसाच घट्ट पकडुन ठेवलेला असतो.अंजली मात्र त्याच्याकडेच पहात असते. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तिला स्वतःला एक वेगळा आनंद देत होते. आता ते लोक आकाशात खुप वरती आलेले असतात. खिडकीतून बाहेर चोहीकडे फक्त आणि फक्त ढग पसरलेले दिसतात. जणु काही स्वर्गातून प्रवास करतोय असं त्याला वाटत होते. आयुष्यातल्या त्या पहिल्या वहिल्या अविस्मरणीय