गाव पारध कोकणातल्या काही गावांमध्ये सराई सुरू झाल्यानंतर दसरा ते थोरलीदिवाळी या सम्याला गावदेवाचा कौल प्रसाद घेवूनसगळ्या वाड्यांमधून घरटी एक माणूस भाले, हात कुऱ्हाडी , दांडे नी ज्याच्याकडे बंदूकअसेल तो बंदूक घेवून सामुहिकपणे शिकारीला बाहेर पडतात. मंडळी एकाबाजूने रान काढीत अख्खासडा पिंजून काढतात.शिकारीत मिळालेले ससे,जवादे, भेकर, साळिंदर,डुक्कर देवाला मानवून झाल्यावर त्याच्या वाटण्याकरून घेतात. यालागाव पारध म्हणतात. पावसापूर्वी शेतजमिनींचीभाजावळ करतात. त्यासाठी सड्यामाळावरची गवतं कापतात नी कवळं तोडून म्हणजे - झाळी तोडून पाल्यासकट डहाळ्यांचे भारेबांधून ते शेत जमिनी भाजण्यासाठी नेतात. याकामांचा आरंभ करण्यापूर्वी रान काढून गाव पारध करतात. एकदा रान काढलं की जंगली