गया मावशी

  • 1.5k
  • 657

गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते….  त्या काळात शाळेला दिवाळीची तीन आठवडे सुट्टी असायची. एकूण आर्थिक परिस्थिती अशी होती की सुट्टीत फारसे कुठे जायची पद्धत नव्हती.सुट्टीत मुले फार फार तर त्यांच्या मामाच्या गावाला किंवा एखाद्या नातेवाईकाकडे जायची!     आमच्या मामीचे आणि आमच्या आईचे फारसे सख्य नव्हते त्यामुळे तिकडे जायचा प्रश्नच नव्हता.    त्यावेळी सगळे सगेसोयरे साधारणपणे शेजारच्या गावात,शेजारच्या तालुक्यात किंवा फार फार तर पंधरा वीस मैलातच असायचे.अशा  गावाला जायचं तर तिकडे जाणारी एखादी बैलगाडी शोधायची, नाही तर आपली हक्काची पाय गाडी ठरलेली!त्या काळात गावात क्वचित  एखाद् दुसरी सायकल असेल फार तर…,आमच्या गावावरून माझ्या मामाच