वसतीची गाडी जुन 78 ते जुन 86 या कालावधित मी राजापुर तालुक्यात कुंभवडे हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून आणि नाणार हायस्कूल मध्ये हेडमास्तर म्हणून नोकरी केली. राजापुर तालुक्यातल्या ब-याच गावांमध्ये दिवसातून फक्त एक एस्टी असायची. संध्याकाळी 4 ते 5 वाजता बस राजापुरातून सुटायची. ती सायंकाळी सहा- साडेसहा पर्यंत गावात पोचायची. ती रात्री त्या गावी वस्तीला राहून दुसरे दिवशी सकाळी 7 वाजता त्या गावाहून राजापुरला निघायची. ड्रायव्हर