भुलाये न बने ....... १९७0/८0 चे दशक म्हणजे ऑर्केस्ट्रांची चलतीअसलेला काळ! बाबला , महेश कुमार, प्रमिला दातारयांचे ऑर्केस्ट्रा कायम हाऊसफुल्ल व्हायचे. या शिवाय शंकर जयकिशन कल और राहुलदेवआज, ओपी नैय्यर मुझिकल नाईट असे अनेक ऑर्केस्ट्रा धुमाकूळ घालित होते. महेश कुमारलताच्या आवाजात ‘ऐ मेरे वतनके लोगो’सादर करी तेंव्हा अक्षरश: टाळ्यांचा कडकडाट होत असे. या सगळ्या गदारोळात तुफानीगर्दी खेचणारा ऑर्केस्ट्रा होता सी. रामचंद्रांचा “ भुलाये न बने”! रत्नागिरीला याऑर्केस्ट्राचा शो जाहीर झाला. नेमके वर्ष आठवत नाही, पण ही साधारणपणे १९७३ - ७४मधली घटना असावी. तेंव्हा पेंटर सोहोनींच्या गाडी तळावरच्या (आताचा सावरकर चौक) गणपतीच्या शाळेत तिकिटविक्री