प्रेम भांडण मैत्री...

  • 1.9k
  • 708

नेहमी हसत असणारी माया आज उदास होती . मला दिसत होत काहीतरी आहे जे ती लपविण्याचा प्रयत्न करत होती . मी तिच्याकडे गेल्या अर्धा तास एकटक पाहत होते तरी तिला त्याचा अंदाज ही नव्हता . थोड्या वेळात तिचे डोळे भरून आलेले दिसले . मला आता राहवेना, मी पुढे जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला तितक्यात माया अनावर होऊन रडू लागली . जणू काही ती माझीच वाट पाहत होती . ती काही व्यक्त करण्याच्या मनस्थितीत नव्हती आणि मी तिला काही विचारण्याच्या ... जवळ जवळ दहा ते पंधरा मिनिटे ती मला मिठी मारून रडत होती आणि त्यामध्ये सुद्धा ती स्वतः सोबत च बोलत