नियती - भाग 29

  • 2.5k
  • 1.5k

भाग 29इकडे रूम मध्ये आल्यानंतर मोहितला रूम मधील सोफ्यावर बसण्याचा इशारा केला मायराने आणि  दाराला कडी घातली.....तसा मोहित दचकला आणि....म्हणाला....."ए बाई.... हे काय करते आहेस तू. ??? ....दरवाजा उघड... बंद करू नकोस..."मायरा दरवाजा बंद करून दरवाजाला टेकून उभी राहिलेली त्याच्याकडे पाहत.....तिच्या नजरे कडे बघूनच तो समजला होता की ती चिडलेली आहे.... त्यालाही त्याची चुकी लक्षात आली आता....भीतीने मनात त्याने आवंढा गिळून गप्प राहून तिच्याकडे पाहू लागला...तिने रागाने दोन्ही हात कमरेवर ठेवून त्याला म्हणाली..."तू मला बाबांसमोर..... आपल्या लग्नासाठी नकार द्यावे असे वाटत आहे म्हणालास...!!"मायराच्या चेहऱ्यावर हावभाव पाहून....मोहित...."अगं ...तसं नाही म्हणायचं होतं मला.... मी.."त्याची भीतीने बोबडी वळली होती...ती एक एक पाऊल समोर येत