चाळीतले दिवस - भाग 6

  • 1.1k
  • 480

चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून मी पुण्यात यायचो तेव्हा माझे बंधू आणि वहीनी बऱ्याचदा एक दोन तशा दूरच्या नातेवाईकांकडे मला घेऊन जायचे.   त्यातलेच एक चौरे नावाचे कुटुंब रास्ता पेठेत क्वार्टर गेट जवळ राहात होते.तसे त्यांच्याशी दूरचे नाते असले तरी माझे बंधू आणि त्यांचे खूपच घरोब्याचे संबंध होते.श्रीयुत चौरे पुणे स्टेशनजवळ पेशवेकालीन दप्तर सांभाळणाऱ्या सरकारी ऑफिसात नोकरी करायचे तर चौरे मावशी घरीच असायच्या.त्यांना दोन मुले आणि एक मुलगी होती त्यातला मोठा मुलगा फुटकळ नोकरी करायचा दोन नंबरचा मुलगा आणि मुलगी कॉलेजला जात होते.  जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्या घरी जायचो त्यांच्याकडून आमचे उत्साहात स्वागत केले जायचे.मावशीचा स्वयंपाकात हातखंडा होता.रास्ता