शोध साहित्यिकांच्या पाऊलखुणांचा - एक अनोखं पर्यटन

  • 702
  • 201

शोध साहित्यिकांच्या पाऊलखुणांचा---एक अनोखं पर्यटन आपल्या कानावर  पुढील गाणी सतत पडत असतात...'  रे घना ये रे धना न्हाऊ घाल माझ्या मना ...'' नाही कशी म्हणून तुला..म्हणते मी ....'' कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे....कुणाचे ओझे..'' इथे भोळ्या कळ्यांना ही  येतोय आसवांचा  वास'किंवा   ' मेंदीच्या पानांवर मन अजून झुलते ग...' '. सांग सांग भोलानाथ......'' माझे जीवन गाणे... गाणे..''  संथ निळे पाणी वर शुक्राचा तारा..'किंवा चक्र, स्पर्श, महानंदा, मालवणी सौभद्र,... ठणठणपाळ.... असं साहित्य अनेक कादंबर्यातसेच ययाती ,दोन धुव्र... अनेक रूपक कथा... कादंबऱ्या... कविता... पटकथा लघुनिबंध...पत्रे...इ.ही यादी न संपणारी... आणि या यादीशी निगडित माणसे आभाळाऐवढी...शब्दांचे ईश्वर पण यांचे व्यक्तीमत्व शब्दांपलीकडचे...शब्दात न मावणारे हे सगळं