नियती - भाग 25

  • 2.7k
  • 1.8k

भाग 25आता सुंदरला आपल्या प्रतिष्ठेला तडा गेल्यासारखे वाटले....त्याचे दुःख दुहेरी होते. मायरा सारखी मुलगी हातची गेली हे एक दुःख आणि  आपली गावकऱ्यांमध्ये बेइज्जत झाली हे दुसरे दुःख.असे दुहेरी दुःखाने सुंदरचे अंतकरण होरपळून गेले.आणि त्याने आपल्या मित्रांसमोर एक शपथ घेतली...""मायराला बायको म्हणून माझ्याच घरी आणिन.... तरच नावाचा सुंदर... नाहीतर डोक्यावरील केस आणि मिशी कापून ठेवीन. बाबाराव कुलकर्णी.... कुठला जावई पसंत करतोय तेच बघायचं आहे मलां....गाठ सुंदर नानाजी शेलार याच्याशी आहे...???""आणि ही बातमी मग.... राममार्फत बाबाराव यांच्यापर्यंत पोहोचली.....बाबाराव..."काय....??? त्या नानाजी शेलारांच्या दिवट्याचीएवढी हिंमत....???की तो बाबाराव कुलकर्णी ला आव्हान करणार....???हा बाबाराव काही एवढा लेचापेचा नाही..... मुंडन करायला तयार राहा म्हणावं...... जावई तर आम्हाला मिळेलच पंचक्रोशीत