९. पिंगळ्याची भाक महिम्न, त्रिसूपर्ण, पुरुषसूक्त पुरे झाले आणि पुर्षाबाळंभटाकडे जायचा बंद झाला. नेहमीप्रमाणे सकाळीच उठून संथा घ्यायला म्हणून तो साळसूदाप्रमाणेघराबाहेर पडायचा. पण बाळंभटाकडे न जाता थेट बंदर गाठायचा. बंदराजवळ सातवाहनाच्या काळातलीपडझड झालेली गढी होती. तिथे दिवसभर गावातली उनाड पोरे हुदू घालायची. बेदाद वाढलेल्यावडा-पिंपळाच्या झाडांवर सूरपारंब्या खेळायची. कुणी हत्ती तलावात पोहायची. भुकेच्याआगीला चिंचा, आवळे, बोरे, चिकणे, भोकरे, ओवळदोडे, आंबे असला रानमेवा आलटून पालटून चाखतायायचा. गावात कोणाचेही पोर घरात नसले की ते हुकमी गढीत असणार हे मुळी ठरलेले गणित!दोन वेळच्या अन्नाची भ्रांत सोडवायच्या उद्योगात गळ्यापर्यंत बुडालेल्या माई दीक्षितीणीलापोराकडे लक्ष द्यायला सवड तरी कुठली व्हायला?बाळंभटजीनी पुर्षाची लक्षणे कधीच ओळखली होती. कोणाचाधाक नसलेले हे