नियती - भाग 23

  • 2.7k
  • 1.8k

भाग 23आणि म्हणूनच ते मोहितला नाकारत होते आणि त्यांनी मनोमन हेही स्वीकारले होते की रक्त जरी त्याचे ब्राह्मणाचे असले तरी लहानपणापासून तो कवडू साठेचा मुलगा म्हणून ओळखले जात होता आणि त्यांची एक जात सोडली तर मोहित एक चांगल्या व्यक्तीमत्त्वाचा अगदी त्यांच्या मायराला शोभेल असाच मुलगा आहे...बाबाराव यांनी झोपाळ्याचा मंद झोका थांबवला आणि वळून पाहत विचारले ...." कोण....??""मी...""कोण पाहिजे तुला... पोरी...??"पुढे येऊन उभी राहिलेली मुलगी ही आपल्या गावातली नक्कीच नाही हे बाबाराव यांनी व्यवस्थित ओळखले होते.तिला पूर्वी कधीही कुठेही पाहिले नव्हते.ही अनोळखी पोर का आली असावी आपल्याकडे...??? अशा विचारांमध्ये बाबाराव थोडा वेळ गप्प बसले एकटक पाहत तिच्याकडे.तिही बाबाराव यांना भेटायला आली