कथानक्षत्रपेटी - 3

  • 312
  • 111

3...  बबी, तू फक्त माझी आहेस उद्या राहुल आणि बबीता च्या लग्नाला दहा वर्षे होणार होती .बबीता राहुल साठी सरप्राईज गिफ्ट घ्यायला गेली होती.संसार वेलीवर अजूनही फुल उमलले नव्हते तरीही त्या दोघांचे आपसातले प्रेम कमी झाले नव्हते .आता दोघांनीही मुल दत्तक घ्यायचे ठरविले होते .आणि ते उद्या त्यांच्या एनिवर्सरी ला अनाथ आश्रमात बाळ दत्तक घेणार होते.लग्नाला एवढे वर्ष होऊनही राहुल ने तिचे लाड करून तिचा अल्लडपणा जपला होता.कारमधून उतरल्यावर आपल्या हॅन्ड बॅग ला हातामध्ये घुमवत घुमवत ती घरात आली. हॉलमध्ये एन्ट्री केल्यावर हातातल्या घड्याळाकडे पाहिले आणि तिला राहुल यायच्या  आधी आपण घरी आलो म्हणून हायसे वाटले.पाच वाजायला अजून एक तास बाकी