माझे ग्रेट आजोबा

  • 2.5k
  • 759

तसं आजोबांचा जन्म सर्वसामान्य कुटुंबातच झाला होता. तापी नदीच्या काठावर बसलेल छोटसं गाव दिवसभर कष्ट करून आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण मिळावं . ही आई वडिलांची खटाटोप असायची. त्यांच्या वडिलांचे नाव परशुराम व आईचे नाव रुखमाबाई . आजोबा सगळ्यात थोरला मुलगा होता. त्यांचा जन्म 01.06.1950 रोजी.जामोद येथे मामाच्या गावी झाला. तसे ते थोरले असल्याकारणाने त्यांचे बरेचसे लाड मामाच्या गावी झाले. त्या काळात त्यांचे मामा श्रीमंत होते. त्यांनाही भरपूर प्रेम आजोबांकडून मिळालं. पण इकडची परिस्थिती जरा बेताचीच होती. आजोबांना चार भावंडे व दोन बहिणी असं त्यांचं कुटुंब होतं. भावंडे लहान होते .त्यांच्याआईना नेहमी वाटायचे की आपल्या मुलाने शिक्षण घेऊन मास्तर झाले