नियती - भाग 19

भाग -19दोन दिवसांपासून त्याचे हृदय तडफडत होते तिला पाहण्यासाठी. तिच्याशी बोलण्यासाठी.तिचा स्पर्श त्याला उभारी देऊन गेला. हृदय उचंबळून आले त्याचे आणि नेत्रातून दोन अश्रू खाली पडले. आणि छातीवर असलेले तिच्या हातावरती ओलावा जाणवला अश्रू पडतानाचा.तसे मग तिने मागून मिठी सोडली आणि त्याच्या पुढ्यात येऊन उभी राहिले... भिरभिर त्याच्या नजरेत बघू लागली तर.....तर तिला त्याच्याही नजरेत तिच्या इतकीच भेटण्याची व्याकूळता दिसली...जेथे दोघेही उभे होते ते शहरातले शेवटच्या भागातल्या साईडचे घर असल्यामुळे येथून पूर्ण निसर्गरम्य वातावरण दिसत होते. सर्व टेकड्यांचा भाग स्पष्ट दिसत होता. त्यातून जाणारे आडरस्तेही वाकडे हेकडे .....हेकडे मेनरोड  एखाद्या चित्रांमध्ये काढल्याप्रमाणे काळे डांबरी रस्ते तेही  सुंदर दिसत होते.हिरव्या टेकडी