खरंच स्रिया स्वतंत्र्य झाल्यात काय?

  • 1.3k
  • 426

खरंच स्रिया स्वतंत्र्य झाल्यात का?          *आज आपल्याला स्री स्वतंत्र्य दिसते. तसेच काही पुरुषही स्री स्वातंत्र्याच्या गोष्टी करतांना दिसतात. त्याचं कारण आहे, स्रियांचा विकास. आज स्रिया हिरीरीनं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कामे करतांना दिसतात. त्यातच काही स्रिया चंद्रावर गेल्या तर काही स्रिया देशाच्या पंतप्रधान व राष्ट्रपतीही. काही स्रिया अधिकारीही बनल्यात. परंतु ह्या मुठभरच स्रिया आहेत की ज्या एवढ्या समोर गेल्यात. आजही अशा बऱ्याच स्रिया आहेत की ज्यांना येथील पुरुषसत्ताक समाजानं धर्म, प्रथा, परंपरा, अंगात येणे, अंधश्रद्धा, रुढी यांच्या साखळीनं बांधून ठेवलेलं आहे. ही एक शोकांतिकाच नाही तर विचार करण्यालायक बाब आहे.*        नियम माणसानं बनवले.