प्रेमावर बंधन नकोच

  • 3.4k
  • 1.1k

प्रेमावर बंधन ; असावेच?                    तो राजेशाहीचा काळ व त्या काळात अनैतिक कृत्य केल्यास मिळणारी शिक्षा. ती शिक्षा काही आजच्यासारखी नव्हतीच. त्या काळात कोणत्याही व्यक्तीनं अनैतिक कर्म केल्यास कोणताही राजा न्याय करतांना सरळ मृत्यूदंडच द्यायचा. तसं पाहिल्यास त्या काळात प्रेमाला कोणत्याही स्वरुपाचा वाव नव्हताच.                   तो काळ व त्या काळात लोकसंख्याही कमी प्रमाणात होती. गाव होतं व गावाचीही लोकसंख्या जेमतेमच असायची. त्यातच प्रेमाला बंधन होतं. प्रेम जर झालं आणि असं आढळून आलं तर गावपंचायत बसायची. ज्यात पाठीवर कोडे मारले जात. ज्यामुळं शरीर रक्तबंबाळ व्हायचं. वळ यायचे,  दुखणं