अनुबंध बंधनाचे. - भाग 14

  • 3k
  • 1.8k

अनुबंध बंधनाचे.....( भाग १४ )आज दिवसभरात जे काही घडलं होतं त्यामुळे एवढ्या सहजपणे दोघांनाही लवकर झोप येणं शक्य नव्हते. अंजलीच्या घरी पार्टी असल्यामुळे तिलाही झोपायला उशीर झाला होता. पार्टीमध्ये डान्स वगैरे करून ती पण थोडीफार थकली होती. पण तरीही तिला पण झोप येत नव्हती. सकाळी जे काही घडलं होतं, ते पुन्हा सर्व डोळ्यासमोरून जात होते. तो क्षण पुन्हा पुन्हा आठऊन ती हाच विचार करत होती, खरच आज जे काही घडले ते स्वप्न तर नव्हते ना...? खरच प्रेम ने माझं प्रेम स्वीकारलं आहे... आता आयुष्यभर तो फक्त आणि फक्त माझाच असणार. ज्या क्षणाची मी एवढ्या आतुरतेने वाट पाहत होते, शेवटी तो क्षण आज आला