मुक्त व्हायचंय मला - भाग १०

मुक्त व्हायचंय मला भाग १०मागील भागावरून पुढे…मालतीला वाटतं होतं तसंच घडलं. माधव आणि सरीता रघूवीर घरी नाही हे बघून मालतीला भेटायला आले."आई तू पुन्हा विचार कर तुझ्या निर्णयावर." माधव म्हणाला." हो आई. अगं या वयात तू एकटी कशी राहशील? आणि बाबांना आता शुगर निघाली आहे.त्यांची काळजी घ्यायला हवी नं." सरीता काळजीने म्हणाली.मालती यावर काहीही बोलत नाही. तिचं गप्प बसणं यांचा अर्थ काय असेल याचा दोघांनाही अंदाज येत नव्हता." आई तू या घरात राहून तुझ्या मनाप्रमाणे जग.तू घरातील कुठल्याही कामात स्वतःला गुंतवू नको." माधव म्हणाला. माधवचा चेहरा खूप गोंधळलेला होता. त्याचा चेहरा बघून मारुतीला मनातून हसू आलं पण चेहरा तिने जाणीव पूर्वक