मुक्त व्हायचंय मला - भाग ३

  • 3k
  • 2.1k

मुक्त व्हायचंय मला भाग ३रघूवीर आणि मालतीचं लग्न साध्या पद्धतीनं पार पडलं. लग्नात रघूवीर कडचे फार कमी लोक होते. मालतीकडच्यांना खूप आश्चर्य वाटलं. लग्न संपन्न झालं. वरात निघाली.रघूवीर नेमाडेंच्या घरी वरात आली. मालतीचा गृहप्रवेश झाला. मालतीनं उखाणा घेतला.रघूवीरच्या काकूंनी पण उखाणा घेतला.रघूवीरने मालतीचे नाव बदलले नाही.पूर्ण लग्नात मालतीला रघूवीरचा ओझरता स्पर्शही झाला नाही. रघूवीरने तशी काळजी घेतली असावी बहुधा.मालती काहीच बोलत नव्हती पण सगळं निरीक्षण करत होती.मालती तिला सांगीतलेल्या खोलीत गेली. छोटीशी खोली होती पण जरा छान  रंग दिलेली होती त्यामुळे बरी वाटते होती. हे घर रघूवीरच्या काकांचं होतं. रघूवीर खोलीत शिरला तशी पलंगावर बसलेली मालती उठून उभी राहिली.तो खोलीत