नियती - भाग 15

  • 3.5k
  • 2.6k

भाग 15आणि त्याला थोडासा मोहित बद्दल... आपल्या मुलाचे वागणे हेही थोडे ...त्याला शंकाग्रस्त वाटत होते... मोहित आल्यापासून कवडूला थोडे वाटत होते की आपला मुलगा प्रेमात पडला आहे कोणाच्यातरी...हा विचार येताच... कवडूच्या अंगावर भीतीचे शहारे उमटले..धडधडते अंतकरण घेऊन कवडू.... बाबाराव यांच्या बंगल्याच्या गेट जवळ आला.... आणि....वॉचमन जवळ कवडूने सांगितले की त्यांच्या मालकांनी त्याला बोलावले आहे. तर दोन वॉचमन पैकी एक वॉचमन बंगल्याच्या आत मध्ये निरोप घेऊन गेला. तेव्हापर्यंत त्याला तिथेच बाहेर उभे राहावे लागले. कवडू ला त्याचे विशेष काही वाटले नाही. त्याला आताही वागणूक तिथे सगळीकडे तशी मिळत असल्यामुळे अंगवळणी पडले होते.आतून वॉचमन निरोप घेऊन आला. कवडू ने तेथेच थांबावे बाहेर....