देवावरुन वाद नकोत

देवांच्या अस्तिवावरुन, वस्तूवरुन वाद ; पुरे आता?           *अलिकडे तर एक गौप्यस्फोट झालाय की तिरुपती बालाजी मंदिरात जो प्रसाद म्हणून लाडू दिला जातो. त्यात गाईची चरबी मिसळवली जाते. मंदिरातील लाडवात गाईची चरबी. काल मंदिरातील पाषाणरुपी देवांवरुन वाद व्हायचे. त्यातच मंदिरातील पाषाणावरुन वाद करणं मानवानं सोडलं. आता वाद आणला मंदिरातील लाडवाच्या चरबीवरुन. मानवाला हेही ओळखता येत नाही की लाडवात चरबी आहे शुद्ध गाईचं तूप आहे. जे चरबीसारखं वाटतं. परंतु वादाला कारण हवं, म्हणूनच त्या वादाला चरबी कारणीभूत ठरली आहे. आता हा वाद केव्हापर्यंत चालतो ते माहीत नाही. कोणी म्हणतात की त्यात राजकारण आहे तर कोणी काहीही म्हणत आपले