नियती - भाग 11

  • 3.9k
  • 3k

भाग 11पण बाबाराव मात्र अगदी शांत होते पाहाडासारखे.त्यांच्या अंतकरणात खळबळ माजली होती. ती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट करून दिसत होती. नेहमी ओठातून शब्द बाहेर पडणारे बंद झाले होते. आणि शांत डोळे असणारे खळबळ माजवू लागले होते.डोळे त्यांचे अंतकरणातील वेदना व्यक्त करत होते..लीला या अजूनही बडबड करत होत्या तर त्यावर थंड स्वरात डोळ्यांत .....तांबडा अंगार घेऊन बाबाराव म्हणाले..."लीला... नशिबात असतं ते चुकत नाही.. ते भोगावंच लागते."अगदी थंडपणे त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले आणि ते शब्दंही थरथरत होते ज्याप्रमाणे त्यांचे हात रागाने थरथरत होते अगदी तसेच.लीला..."पण हे कसलं नशीब ??? ...काय कमी आहे हो तिला. काही सांगू नका तुम्ही.... काहीतरी करा लवकर.."हताश स्वरामध्ये