कामीनी ट्रॅव्हल - भाग ४३ (अंतिम भाग)

  • 1.2k
  • 498

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ४३ कामीनी ट्रॅव्हल्सला पुरस्कार मिळाल्याचा आनंद पटवर्धन कुटूंबात भरभरून वाहत होता. या आनंदाच्या पार्श्वभूमीवर कामीनीबाईंनी आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली. " प्राची, हर्षवर्धन पुरस्कार मिळाल्याने आपल्या सगळ्यांना खूप आनंद झाला आहे.यामुळे तुम्हा दोघांचा मूड छान आहे तेव्हा मला वाटतं तुम्ही आता कुठेतरी फिरायला जावं. मागच्या वेळी अर्ध्यातून तुम्हाला परत यावं लागलं होतं. त्यामुळे आता पुन्हा जा. यांची काळजी करू नका.मी आहे. प्रदिप आणि तन्मय आहे." कामीनी बाईंच्या बोलण्यावर भय्यासाहेबांनी पण होकारार्थी मान डोलावली. "हे बघा मी आता ठीक आहे.तुम्ही आता खरंच कुठे तरी फिरायला जा.तुमच्या आयुष्याची नव्याने सुरुवात करा. मधला संघर्षाचा काळ विसरा.आम्ही इथे व्यवस्थित आहोत." कामीनी