मला स्पेस हवी पर्व २ भाग ३३ (अंतिम भाग)

  • 1.6k
  • 774

मला स्पेस हवी पर्व २ भाग ३३ अंतिम भाग आज नेहाचा जाण्याचा दिवस उजाडला.आज नेहा जाणार यामुळे सुधीरच्या आईला फार वाईट वाटत होतं. चहा करताना त्यांचे अजिबातच लक्ष नव्हतं. चहा यायला इतका उशीर का लागतो आहे हे बघायला सुधीरचे बाबा स्वयंपाक घरात आले तर त्यांना दिसलं की सुधीरच्या आईची कुठेतरी तंद्री लागली आहे आणि गंजातलं चहाचं पाणी आटून चाललं आहे. त्यांनी लगेच गॅस बंद केला आणि म्हणाले," अगं तुझं लक्ष कुठे आहे ?चहाचं पाणी सगळं आटलं."यावर त्या म्हणाल्या," आज जरा अस्वस्थ वाटतं आहे."सुधीरचे बाबा म्हणाले," तुझे पाय दुखतात आहे का? जा आराम कर. मी करतो चहा."" नाही हो पाय वगैरे