त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का? - भाग 3

  • 1.3k
  • 765

या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का भाग ३मागील भागात आपण बघीतलं की मृदुला सासुबाईंना मिठी मारून ढसाढसा रडली. तिला शांत होण्याची सासूबाईंनी वाट बघितली. मृदुला सासूबाईंना सांगेल का झालं? बघू या भागात.बराच वेळाने मृदुलाचं रडणं थांबलं. तिने सासूबाईंना मारलेली मिठी सोडली. डोळ्यातून गालावर ओघळलेले अश्रू तिने हळूच पुसले." झालीस का बाळा शांत?"" हं" दबक्या आवाजात हुंदका आवरत मृदुला उत्तरली." काय झालं?"सासूबाईंनी विचारलं."आई कृपा आज सकाळी गेली."" काय?"सासूबाईंंचाही यावर  विश्वास बसला नाही. " सकाळीच हरीशचा मेसेज आला. आई कृपा जाणार हे सहा महिने आधी कळलं होतं हो पण ती इतकी सकारात्मक ऊर्जेने वावरत होती की तिने कधी कोणाच्या डोळ्यात अश्रू