त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का? - भाग 2

  • 1.3k
  • 753

या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का भाग२सकाळी कृपा गेल्याचं कळल्यापासून मृदुलाचं मन जडशीळ झालं होतं. तिला अजीबात काहीच करायची इच्छा होत नव्हती. कृपा भेटून दोनच वर्ष झाली होती. या दोन वर्षांत मृदुला मध्ये खूप बदल घडला होता.कृपाच्या सानिध्यात राहून तिचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन खूपच व्यापक झाला होता.वैद्यकीय क्षेत्रात डाॅक्टर मृदुला हे नाव खूप विश्वासाने घेतल्या जाई. पेशंट, त्यांचे औषधोपचार, पेशंटचं काऊन्सलिंग आणि सतत असणारे सेमिनार यात मृदुला पूर्ण बुडालेली होती.आधी ती डाॅक्टर म्हणून पेशंटला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आयुष्याकडे कसं बघायचं या विचारांची रुजवण करायची पण कृपाला भेटल्यावर त्या दृष्टीकोनाला साहित्यिक तरल संवेदनांची झालर  मिळाली आणि मृदुलाच्या काॅऊन्सिलींग मधील रूक्षता