त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का? - भाग 1

  • 5.3k
  • 2.1k

या फुलांच्या गंधकोषी…सांग तू आहेस का? भाग १" कृपा गेली…एक निरागस शब्द संपला. आयुष्याच्या अर्ध्या वाटेवरच हा शब्द मला सोडून गेला. माझ्या श्वासापेक्षाही हा शब्द मला प्रिय होता.आता मी काय करू डाॅक्टर? काळ सगळ्यावर औषधं असतं असं म्हणून माझं सांत्वन करून नका.माझा शब्द मला परत देता आला तर द्या."हरीशसकाळी सकाळी हरीशचा मेसेज वाचून डाॅक्टर मृदुला सुन्न झाली.सकाळच्या या प्रसन्न वेळेला उदासीची गडद छाया दाटून आली असं मृदुलाला वाटलं.***कृपा ही मृदुलाची पेशंट होती. मृदुला ही डाॅक्टर आहे  आणि ती  कॅंन्सर पेशंटचं काऊन्सलिंग करत असे.  कृपा जेव्हा पहिल्यांदा मृदुलाच्या दवाखान्यात आली तो दिवस मृदुलाला आठवला.कृपा आपले सगळे रिपोर्ट घेऊन मृदुलाच्या ओपीडी मध्ये