नियती - भाग 7

  • 3.8k
  • 1
  • 2.7k

भाग 7...नकळत आपोआप तिचे पाय आवाजाच्या रोखाने जाऊ लागले.आणि जवळ जाताच ती खुळ्यागत पाहतच राहिली.झुडपांच्या जाळीत एक गोरेपान पोर अडकलेले होते. क्षीण आवाजात अधून मधून रडत होते. तोंडातून फेस ही येत होता त्याच्या.न रहावून पार्वती त्याला घेण्यास खाली वाकली.. पण ती पाहून आणखीन थबकली कारण....त्याच्या एका अंगाला लाल मुंग्या चावत होत्या. तेथून रक्तही येत होते. ते पाहून पार्वतीचा जीव गलबलला.आणि खाली वाकून त्याला घेण्यास हात पुढे केले. पुन्हा ती थबकली आणि घाबरली ही. या बाळाला आपण हात लावावे की लावू नये.. हा विचार तिच्या मनात आला.अगोदरच गावामध्ये त्यांना बऱ्याचशा गोष्टीला हात लावायला आणि प्रवेश घ्यायला मनाई होती.असा सगळा विचार मनात चालू