नियती - भाग 5

  • 6.3k
  • 5.3k

भाग-5मुखातून एकदा शब्दाचे बाण बाहेर पडल्यानंतर आपण ते परत घेऊ शकत नाही हे तेवढेच खरे आहे. आणि जिव्हारी लागलेले शब्द सारखे बोचत असतात हृदयात.त्याने चालणे थोडे मंद केले तेवढेच तिच्यासोबत बरोबरीने चालता येईल असे वाटून. पण ती आता थोडी भरभर चालू लागली होती...नाईलाजाने मग तोही फास्ट चालत तिच्याबरोबर  समांतर पावले टाकू लागला...गेट जवळ पोहोचताच मात्र... तो भीतीने समोर पाहू लागला....समोर त्यांच्या घरचा भला मोठा पुतळा काळाकुट्ट कूत्रा आपले घारे डोळे टकमक करून लांब जीभ काढून उभा होता.त्याच्याकडे बघून त्याच्या अंगी सरसरून घाम फुटला.तेवढ्यात मायराने त्या कुत्र्याला आवाज दिला.मायरा..."शेरू !!! बाजूला हो... शेरू... शेरू काय सांगितलं...?? समजलं का ??? बाजूला हो