चाळीतले दिवस - भाग 1

  • 10.7k
  • 5.7k

चाळीतले दिवस भाग 1शिक्षणासाठी पुण्यात माझ्यापेक्षा मोठ्या बंधूकडे, (त्याला मी आण्णा  म्हणायचो) यायचे माझे स्वप्न होते.माझ्या दहावीनंतर दोन वर्षे ते स्वप्न मला हुलकावणी देत होते.आण्णा त्यावेळी एका नामांकित बांधकाम क्षेत्रातल्या कंपनीत नोकरीला होता.   बारावी झाल्यानंतर मात्र ते स्वप्न पूर्ण होईल असे वाटत असतानाच आण्णाला कंपनीच्या वतीने कुवेतला जाण्याची संधी मिळाली.तिकडे जाताना त्याने माझ्यावर त्याची नागपूर चाळीत असलेली झोपडीवजा खोली सोपवली. पुण्यात येरवडा जेल जवळच्या नागपूर चाळीत माझी रहायची सोय झाली.  पुण्यात कोणत्या कॉलेजला जायचे हॆ आधी ठरवले नव्हते.बारावीत गट्टी झालेल्या आम्हा पाचसहा मित्रांनी एकत्र येऊन आम्ही कर्वे  रोडवर असलेल्या गरवारे कॉलेजला प्रवेश घेतला.राजेंद्र ढवळे, विकास लोंढे  आणि बाकी  दोन मित्र  कॉलेज जवळच्या  हॉस्टेलला रहाणार होते.त्यांच्या बरोबर रहायची इच्छा असली