अनुबंध बंधनाचे. - भाग 10

  • 3.9k
  • 2.9k

अनुबंध बंधनाचे.....( भाग १० )प्रेम आणि अंजली यांचं नातं आता हळु हळू असच फुलत चाललं होतं. त्यांचं बोलणं आता अजुन वाढलं होतं, अधून मधून भेटत होते. नकळत दोघांनाही आता एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटू लागला होता. अंजली वयाने खुप लहान होती. या गोष्टीचं नेहमी भान ठेऊनच प्रेम तिच्याशी फक्त मैत्रीच्या नात्यानेच रहात होता. ते अंतर ठेवूनच तो तिच्याशी वागत होता. सर्व लहान मोठ्या गोष्टी एकमेकांसोबत बोलल्या जात होत्या. असेच छान दिवस चालले होते. दोघेही एकमेकांसोबत खुप खुश होते. बघता बघता अशीच दोन वर्ष निघुन गेली. या दोन वर्षांमध्ये ते दोघे अजुनच जवळ आले होते. त्यांची मैत्री आता हळु हळु वेगळं वळण घेत होती. प्रेम आता