नियती - भाग 2

(19)
  • 8.8k
  • 7.9k

भाग 2मोहित जेव्हा स्टेजवर आला तेव्हा तो गोंधळून गेला होता.अगदी तसंच जेव्हा दाखवायला आणलेल्या मुलीला हातात चहाचा ट्रे देतात आणि  हॉलमध्ये पाठवून सर्वांसोबत बसवून मग प्रश्न विचारतात तेव्हा जशी तिची अवस्था होते त्या बिचार्‍याची अवस्था झाली होती.सर्वांग घामाने डबडबले त्याचे...फासावर चढवण्यासाठीच जणू त्याला आणलेले होते.कसाबसा थरथरत्या पायांनी मोहित स्टेजवर चढला.शाल श्रीफळ तसेच डिग्री देऊन मान्यवरांनी त्याचा सत्कार केला...उसने अवसान आणून चेहरा हसतमुख ठेवला होता त्याने.तेवढ्यात संचालन करणाऱ्या विद्यार्थिनींनी म्हटले..."तर डियर फ्रेंड्स....मिस्टर मोहित आता आपल्या सोबत आपले विचार , आपले एक्सपिरीयन्स...शेअर करतील..सो... मिस्टर मोहित....!!!"आणि हे ऐकूनच त्याचे पाय......त्याच्या पायात आतापर्यंत जो त्याने धीर एकवटून ठेवलेला होता ..तोही आता गळून पडला...आणि...............आणि आता