अनुबंध बंधनाचे.....( भाग ९ )प्रेम आणि अंजली तिच्या घराजवळ येऊन पोहोचतात, एका सुसज्ज अशा सोसायटी मधील बिल्डिंग मधे पहिल्या मजल्यावर अंजली रहात होती. दरवाज्याजवळ पोहोचताच तिने बेल वाजवली. प्रेम थोडा अस्वस्थ वाटत होता. अंजलीच्या आईला कसं सामोरं जायचं, हेच त्याला कळत नव्हतं. त्यांनी काही विचारले तर काय बोलायचे. हा सर्व विचार मनात चालु असतानाच दरवाजा उघडला गेला. आणि समोर अंजलीची आई ( मॉम ) उभी होती.तिला पाहून अंजली बोलली....अंजली : मॉम... बघ कोण आलंय...?मॉम : मला वाटतं की...हा प्रेम आहे, बरोबर ओळखलं ना...अंजली : हो... अगदी बरोबर ओळखल...* असे बोलुन मॉम प्रेमला आत यायला सांगते. प्रेम थोडा घाबरतच आत येतो. आत येताच