अनुबंध बंधनाचे. - भाग 7

  • 3.6k
  • 2.8k

अनुबंध बंधनाचे.....( भाग ७ )कॉलेज आणि ऑफिसच्या कामात थोडे दिवस असेच निघुन गेले. पण प्रेमला अंजलीला भेटण्याची इच्छा मनातून जात नव्हती. एक दिवस असाच विचार करत असताना त्याला काही दिवसांपूर्वीच बोलणे आठवले. ख्रिसमसच्या दिवशी रात्री तिच्या स्कूळजवळ असलेल्या चर्च मधे ती आणि तिची फॅमिली दरवर्षी येतात. ' तु पण येशील का ख्रिसमसच्या रात्री मला भेटायला ' अशी तीच सतत बोलत असायची. प्रेमला आता अंजलीला भेटण्याचा अजुन एक मार्ग मिळाला होता. अखेर तो दिवस आला होता. आदल्या दिवशीच रात्री बारा वाजता चर्चमध्ये अंजली आणि तिची फॅमिली प्रेयर साठी येणार होते हे त्याला नक्की माहित होते.प्रेम रात्री जेऊन झाल्यावर थोड्या वेळाने ताईला बाहेर मित्राकडे जातोय, रमेश आला