अनुबंध बंधनाचे. - भाग 6

  • 1.1k
  • 492

अनुबंध बंधनाचे.....( भाग ६ )प्रेमच्या आयुष्यात हे जे काही चालु होते, याची कल्पना कोणालाही नव्हती. ग्रुप मधे पण कोणाला तो अंजली बद्दल काहीच बोलत नव्हता. एवढ्या छोट्या मुलीशी फ्रेंडशिप केलीय, हे सांगायला पण त्याला बरं वाटत नव्हते. सर्वजण काय विचार करतील माझ्याबद्दल... हा विचार करून तो कोणालाच काही बोलत नव्हता. त्याचे नेहमीचे रुटींग चालु होते. वेळ मिळेल तेव्हा तो अंजलीसोबत फोनवर बोलत होता. दोघांनाही आता एकमेकांशी बोलल्याशिवाय राहवत नव्हते. कधी कधी ऑफिसमधील कामामुळे त्याला रोज कॉल करायला जमायचे नाही. मग अंजली त्याच्यावर नाराज व्हायची. तो पण गोड बोलुन तिचा राग घालवायचा. एकदा प्रेम अचानक अंजलीला न सांगता गावी गेला. चारपाच दिवसांनी परत आला. ऑफिस मधे आल्यावर