ते पाळणाघर

  • 6.2k
  • 2.2k

ते पाळणाघर गुरुदासपूर नावाचं ते गाव होतं. त्या शाळेला एक शिक्षक शिकवीत होते. ज्यांचं नाव होतं मकरंद. मकरंद नुकताच त्या शाळेत रुजू झाला होता. त्यानं पाहिलं की त्या शाळेत दोनचारच मुलं आहेत. जे शिकण्याची आस ठेवतात. बाकीची मुलं ही शाळेत येत नाही. ती का,येत नाही. याचा थांगपत्ता त्याला नव्हता. तसा तो रुजू होताच त्या शाळेत जे दोन तीन जणं आले होते. त्यांना कारणं विचारलीत. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की ते शेतावर जातात आपल्या आईवडीलांबरोबर. काही जणांनी सांगीतलं की ते आपल्या लहान भावा बहिणीला सांभाळायला घरी राहतात. काहींनी सांगीतलं की शाळा कंटाळवाणी वाटते म्हणून ते घरी राहतात. ती त्या मुलांची उत्तरं.