अनुबंध बंधनाचे. - भाग 4

  • 4.1k
  • 2.7k

अनुबंध बंधनाचे.....( भाग ४ )दुसऱ्या दिवशी रविवार होता. त्यामुळे प्रेम जरा उशीराच उठला होता.गेले काही दिवस रोजचे कॉलेज, ऑफिस, आणि रात्री जागरण यामुळे खुप थकुन गेला होता. म्हणुन त्याने आज दिवसभर घरीच आराम केला. मधेच त्याला अंजली बद्दल विचार येत होते. पण खुप विचार करून त्याकडे दुर्लक्ष करायचे असे ठरवले. दोन दिवसांनी कोजागिरी पौर्णिमा होती. त्याचा मित्र त्याला सांगायला येतो. बुधवारी कोजागिरीच्या दिवशी वाजवायची ऑर्डर आहे तिथेच तु येशील का ? प्रेम ने सरळ नाही येणार म्हणुन सांगितले. त्या दिवशी मुले कमी होती त्यामुळे त्याचा मित्र जाताना पुन्हा त्याला बोलवायला आला. प्रेम नुकताच ऑफिस मधुन घरी आला होता. त्यांच्यासोबत त्याला जाणं गरजेचं वाटले. म्हणुन